
नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ गायक व पं. अण्णासाहेब गुंजकर यांचे ज्येष्ठ शिष्य पं. रमेश कानोले यांचे शनिवारी सायंकाळी 7:30 वा. उपचारादरम्यान निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्यामागे एक मुलगा, एक मुलगी, जावई नातवंडे असा परिवार आहे.
पंडित रमेश कानोले आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलावंत होते. अभिजात शास्त्रीय संगीतासाठी त्यांचे मोलाचे योगदान राहिले. नांदेडच्या सांगितिक वाटचालीस त्यांनी मोलाचा हातभार लावला होता. संगीत कट्यार काळजात घुसली व संगीत सुवर्णतुला या नाटकांमधून त्यांनी संगीत रंगभूमी गाजवून सोडली. त्यांचा शिष्य परिवार खूप मोठा असून सूरमणी धनंजय जोशी, हेमंत खडकीकर, सौ मनीषा देशपांडे आणि कन्या संगीता आचार्य ही काही प्रमुख नावे आहेत. प्रसिद्ध तबलावादक महेश कानोले यांचे ते वडील होते.


























































