
मुंबादेवी येथील अजान स्पर्धेवरून सुरू असलेल्या राजकारणाचा शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी निषेध केला आहे. अजान स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात कोरोनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे अशा सूचना आपण आयोजकांना दिल्या. त्याचप्रमाणे शुभेच्छा देताना आपला धार्मिक किंवा राजकीय हेतू नव्हा असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी ही स्पर्धा आपण आयोजि केली नसल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले, मुंबादेवी विधानसभेतील फाऊंडेशन फॉर यू नावाच्या संस्थेचे पदाधिकारी माझ्याकडे आले हाते. त्यांनी ‘अजान’ची स्पर्धा खुल्या प्रकारे आयोजित केली होती. मी त्यांना सदर स्पर्धा घेण्यासंदर्भात कोरोनाविषयक नियम अवगत करून दिले. सदर स्पर्धा खुल्या प्रकारे आयोजित केल्यास कोरोना विषयक नियमांची पायमल्ली होईल, हेही पदाधिकाऱयांच्या निदर्शनास आणून देतानाच खुल्या प्रकारे स्पर्धा आयोजितक करण्यास विरोध दर्शविला. मात्र यास शेवटचा पर्याय म्हणून ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने करण्यास सुचविले व या स्पर्धेच्या आयोजनला शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारच्या शुभेच्छा देताना माझ्या मनात पुठल्याही प्रकारे धार्मिक अथवा राजकीय हेतू नव्हता त्यामुळे या गोष्टीचे वेगळ्या अर्थाने राजकारण करण्यात येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

































































