बीड जिल्ह्यातील दोन सत्ता केंद्र भक्ती स्थळावर एकत्र

83

सामना प्रतिनिधी । बीड

बीड जिल्ह्याला शक्ती आणि भक्तीचा मोठा वारसा लाभला आहे. नारायण गड, भगवान गड सारखे अध्यात्माचे केंद्र बीड जिल्ह्यातील जनतेच्या मनाला स्फूर्ती आणि ऊर्जा देत असतात. आज याच नारायण गडावर बीड जिल्ह्यातील दोन सत्ता केंद्र विकासासाठी दाखल झाले. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत विकास कामांचा शुभारंभ करत पालक मंत्री पंकजा मुंडे आणि रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर समाधी स्थळावर नतमस्तक झाले.

शेकडो वर्षांची परंपरा असणारे अध्यात्माचे केंद्र बिंदू नारायण गड बीड जिल्ह्यातील जनतेला समानतेची आणि अध्यात्माची शिकवण देत आले आहे. धाकटी पंढरी म्हणून ओळख असणारे नारायण गड शक्तीचे सर्वोच्च केंद्र म्हणून ओळखले जाते. लाखो भक्तगण जिल्ह्याभरात विखुरले असले तरी आशीर्वादासाठी नारायण गडावर दाखल होत असतात. भक्तीचा मार्ग दाखवणारे नारायण गड बीड जिल्ह्यासाठी अध्यात्मिक केंद्र होय. आज याच नारायण गडावर हजारो भक्तांच्या साक्षीत विकास कामाचा शुभारंभ करण्यासाठी बीड जिल्ह्यातील दोन सत्ता केंद्र दाखल झाले. पालक मंत्री पंकजा मुंडे आणि रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज एकत्र येऊन विकास कामाचे श्रीफळ फोडले. जयदत्त क्षीरसागरांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पाहिल्यादाच ते आणि पालकमंत्री पंकजा मुंडे सोबत विकास कामाच्या शुभारभासाठी नारायण गडावर एकत्र आले. बीड विधानसभा मतदार संघातील नारायणगडाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम जयदत्त क्षीरसागर यांनी हाती घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या