परभणीत पॉझिटिव्ह तरुण रुग्णाचा तिसरा अहवालही निगेटिव्ह, जिल्हा कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पोझिटिव्ह रुग्णाचा तिसरा स्कॅब अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे परभणी जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील एक तरुण 13 एप्रिल रोजी पुण्याहून दुचाकीने परभणीतिल एमआयडसी भागात नातेवाइकांकडे आला होता. या तरुणांची जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करण्यात आल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे परभणी जिल्ह्यात पहिल्यादाच या तरुणाच्या निमित्ताने कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले. त्यानंतर या तरुणांच्या संपर्कात आलेल्या 9 नातेवाईक आणि अन्य 19 अशा 28 जणांचे अहवाल दुसऱ्यांदाही निगेटिव्ह  आले. त्या नंतर शनिवारी सायंकाळी करोना पॉझिटीव्ह तरुणाच्या स्वॅबचा दुसरा अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला होता. त्यामध्ये सदरील स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर रविवारी या तरुणांचा तिसरा स्वॅब अहवाल घेण्यात आला. त्यात या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकरी दीपक मूगळीकर यांनी दिली.