परळी-बीड मार्गावर पांगरी येथे बैलगाडीला ट्रकची धडक; एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परळी-बीड मार्गावर पांगरी येथे शेतातून घरी जात असताना बैलगाडीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने बैलगाडीत बसलेले दोनजण खाली पडले. त्यातील एकजण ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमीला परळी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

रविवारी दोन तरुण शेतातून बैलगाडी घेऊन पांगरी गावाकडे जात असताना सिरसाळा ते परळीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने बैलगाडीला जोराची धडक दिली. या जोराच्या धडकेने बैलगाडीतील अमोल किंचक खेत्रे (वय 23 वर्ष) आणि तिडके ( वय 21) हे दोघे खाली पडले. त्यातील अमोल खेत्रे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर तिडके हा गंभीर जखमी असून त्याला परळीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत अमोल हा एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन बहीण, व आई-वडील असा परिवार आहे.