सोशल डिस्टन्सिंगचे नियम झुगारत परळीत भाजपचे आंदोलन

971

भाजपने विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन पुकारले होते. हे आंदोलन परळीच्या स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर दुपारी 12 च्या दरम्यान करण्यात आले. मात्र आंदोलनात सोशल डिस्टंसिंगचे नियमच पाळले न गेल्याने हे नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच लागू आहेत का असा प्रश्न निर्माण झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात कलम 144 व 188 लागू करण्यात आलेलं आहे. यामुळे कुठेही जमावबंदी करण्यास सक्त मनाई आहे, असे असतानाही आज परळीत भाजपाच्या वतीने आंदोलन केले गेले. या आंदोलनात 25 आंदोलक सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे बँकेत कामासाठी येणाऱ्या खातेदारांना त्रास सहन करावा लागला. या आंदोलनात राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात ट्रॅफिक जाम झालं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच या आंदोलनात कधीही न दिसणारे भाजपचे नेते पदाधिकारी सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या