
अंबाजोगाईतील खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील क्रिडा शिक्षकाने नववीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणातील आरोपीला फासावर द्याअशी मागणी शिवसेना, हिंदुस्थानी विद्यार्थी सेनेच्या वतीने विद्यार्थीसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल दुबे यांनी केली. अंबाजोगाई शहरातील या घटनेनंतर अतुल दुबे यांनी तात्काळ या घटनेचे तपासणी अधिकारी उपविभागीय अधिकारी राहुल धस व खोलेश्वर शाळेतल्या मुख्याध्यापिका धर्मपात्रे यांची भेट घेऊन या आरोपीचे तात्काळ निलंबन करून पॉस्को अंतर्गत लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली.

































































