परभणी – दोन दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मौजे पाचेगाव येथे बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमरास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तसेच या अपघातात चार जण जखमी झाल्याचे समजते आहे.

तालुक्यातील पांगरी येथील लग्न पोखर्णी दराडे याठिकाणी असल्याने लग्न लावून पांगरी येथील तिघे जण एका दुचाकीवर बसून जिंतूर शहराकडे येत होते. तसेच जिंतूर शहराकडून असेगांवकडे जात असताना जिंतूर-औंढा रोडवरील पाचेगाव याठिकाणी दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. उपचारासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी कल्याण मधुकर पवार (25) हा मरण पावल्याचे घोषित केले, तर बबलू पवार (26) हा गंभीर जखमी झाला. तसेच पांगरी येथील विजय बुधवंत (25) ,गोविंद डुकरे (21) मारुती घनवटे (23) हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.