परभणीत विसर्जन मिरवणूकीत तेरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेश विसर्जनच्या मिरवणूकीत एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर त्याच्या मित्राला वीजेचा धक्का बसल्याची घटना घडली. चारठाणा येथून 15 कि.मी. अंतरावर असलेल्या मौजे जाम कुडा (ता.सेलू) येथे गुरुवारी ही घटना घडली आहे. युवराज अशोकराव कांदे असे मृत मुलाचे नाव आहे. तर मनोज परसराम अदाबे (14) असे दुसऱ्या मुलाचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन्ही मुलांना प्राथमीक उपचारासाठी जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान युवराजचा मृत्यू झाला. तर जखमी मनोजवर उपचार सुरू आहेत. युवराजचे वडील अशोक कांदे यांच्या फिर्यादीवरून चारठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आली आहे. अधिक तपास चारठाणा पोलीस करत आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून याआधी वीज तारा तुटल्यामुळे २ बैलही दगावले होते. तसेच या परीसरात या महावितरण कंपनीच्या विद्युतपुरवठा करणारे विद्युत तारा, पोल खुप जीवघेणा खेळ झाला आहे. याचा येथील मानवी मानवी जिवाला धोका निर्माण होत आहे, असे लेखी स्वरुपात निवेदन देण्यात आले होते. तरी या महावितरण कंपनीच्या वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी हलगर्जीपणा करत यामुळे या काल या अचानक घडलेल्या घटनाचे जबाबदार महावितरण कंपनी आहेत, असे या मयताच्या वडील येथील गावातील ग्रामस्थ बोलत आहेत. आता तरी महावितरण कंपनाचा घोळ बंद, करावा अशी मागणी केली जात आहे.