संसद अधिवेशनाचे सूप वाजले, कोरोनामुळे सगळेच हैराण, 10 दिवस कामकाज

parliament

कोरोनाचा होत असलेला मोठ्या प्रमाणावर पैâलाव लक्षात घेऊन आज नियोजित वेळापत्रकापूर्वीच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजविण्यात आले.

संसदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विरोधी पक्ष नेत्यांच्या अनुपाqस्थतीत पार पडली. त्यानंतर संसदीय कामकाज राज्यमंत्री मुरलीधरन यांनी कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन संसदेचे अधिवेशन संस्थगित करण्याचे सूतोवाच राज्यसभेत केले. त्यानंतर राज्यसभेचे व लोकसभेतील आवश्यक कामकाज आटोपल्यावर लोकसभेचे कामकाज आटोपले.

बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण तातडीने करा
बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करा, ही मागणी गेल्या सात वर्षांपासून दिल्लीत धूळ खात पडून आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव तयार करून वेंâद्राकडे पाठवला होता. पंधराच्या वर पत्रे केंद्र सरकारला पाठवली आहेत. शिवसेनेने वेळोवेळी या मुद्द्यावर आवाज उठविला आहे मात्र, अजूनही सरकारने तो मार्गी लावलेला नाही. त्यामुळे तातडीने बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करा, अशी मागणी शिवसेनेने आज राज्यसभेत केली. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी विशेष उल्लेखाद्वारे या मुद्द्याकडे लक्ष वेधले. बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करण्याची मागणी ही समस्त मराठी माणसाची असून मराठी आस्मितेशी निगडित आहे. संपूर्ण महाराष्ट्राची जनभावना लक्षात घेऊन वेंâद्र सरकारने तातडीने हा विषय मार्गी लावावा, अशी मागणीही खासदार अनिल देसाई यांनी केली.

विरोधकांचे बहिष्कारास्त्र सुरूच
कृषी विधेयकांवरून संसदेत निर्माण झालेला तणाव संसद अजूनही निवळलेला नाही. राज्यसभेत आजही विरोधकांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घातला. त्याचबरोबर संसद भवनाच्या प्रांगणात विरोधकांनी लोकशाही वाचवा, शेतकरी कामगार वाचवा, अशा घोषणा दिल्या. दरम्यान, आठ खासदारांनी संसद भवनाच्या पटांगणात सुरू ठेवलेले धरणे आंदोलन आजही सुरू आहे. उपसभापती हरिवशंिंसग यांनी मात्र, आपल्या एक दिवसाचे उपोषण आज संपवले.

आपली प्रतिक्रिया द्या