
बंगळुरूवरून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात लँडिंगदरम्यान एका प्रवाशाने आपत्कालीन गेट उघडण्याचा प्रयत्न केला. विमान जमिनीपासून केवळ 500 फूट उंचीवर उतरण्याच्या स्थितीत होते. आपत्कालीन गेट उघडण्याच्या प्रयत्नाची माहिती मिळताच पायलटने तत्काळ विमान हवेत उचलले. त्यानंतर वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाल्यावर केबिन क्रू आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
इंडिगो फ्लाइट 6 ई-185 ने शनिवारी रात्री सुमारे 8.15 वाजता बंगळुरूहून उड्डाण केले. मोहम्मद अदनान नावाच्या तरुणाने उड्डाणानंतर अवघ्या 15 मिनिटांतच पहिल्यांदा ओरडत आपत्कालीन दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. परंतु विमान कर्मचाऱ्यांनी त्याला शांत केले. त्यानंतर तो आपल्या जागेवर आरामात बसून राहिला. त्यानंतर लँडिंगदरम्यान त्याने पुन्हा तेच कृत्य केले.


























































