
पतंजलीच्या ‘कोरोनील’ व ‘श्वासारी’ या औषधांबद्दल केंद्रीय आयुष मंत्रालयाचा गैरसमज दूर झाला असुन आता ही औषधे देशभरात उपलब्ध होतील, असा दावा योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी बुधवारी केला. या औषधांवर कोणताही कायदेशीर निर्बंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात आम्ही वेगवेगळ्या राज्य सरकारांशीही बोललो असल्याचे ते म्हणाले.
आज पतंजली आयुर्वेदच्या हरिद्वार येथील आश्रमात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वामी रामदेवबाबा यांनी कोरोनील व श्वासारी या औषधांच्या संदर्भात असलेले मळभ दूर झाल्याचा दावा केला. औषधांवर ‘कोविड केअर’ असा शब्दप्रयोग न करता ‘कोविड मॅनेजमेंट’ असा शब्दप्रयोग करावा असे आयुष मंत्रालयाने सुचवले असून आम्ही ते मान्य केल्याचे रामदेवबाबा यांनी स्पष्ट केले. आयुर्वेदिक औषधांच्या विरोधात ड्रगमाफियांनी दुष्प्रचार केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मानवतेसाठी पतंजली आयुर्वेदने जे काम केले आहे त्याचे कौतूक करू नका, पण त्याचा तिरस्कारही करू नका असेही ते म्हणाले.
आणखी एका लसीची मानवावरील चाचणी यशस्की
जगभरात कोरोना प्रतिबंधक लस बनकण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आणखी एका कोरोना प्रतिबंधक लसीची मानवावरील चाचणी यशस्वी झाली आहे. अमेरिकेतील बायोटेक फर्म इनोक्हिओने बनवलेली लस 94 टक्के यशस्वी झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. इनोव्हिओ कंपनीने या लसीला ‘आयएनओ-4800’ असे नाव दिले आहे. अमेरिकेत 18 ते 50व योगटातील चाळीस जणांकर या लसीची चाचणी करण्यात आली. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. या चाळीस जणांना चार आठवडय़ात दोन वेळा ही लस देण्यात आली. त्यानंतर कोरोनाला प्रतिबंध करणारी रोगप्रतिकारक क्षमता त्यांच्यामध्ये वाढली आणि कोणतेही साईड इफेक्ट्स झाले नाहीत असा कंपनीचा दावा आहे.