
मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये टोटल नी रिप्लेसमेंटकरिता अत्याधुनिक स्वरूपाचा पेन प्रोटोकॉल विकसित केला आहे. नॅव्हिगेशन आणि वेदनारहित शस्त्रक्रियांद्वारे गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये अॅडव्हान्स प्रगतीमुळे रुग्णाचे जीवन सुखकर झाले आहे. बहुतेक रुग्ण शस्त्रक्रियेनंतरच्या वेदना लक्षात घेऊन संपूर्ण गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया निवडण्यास घाबरतात.
वोक्हार्ट हॉस्पिटल-मुंबई सेंट्रलमधील डॉक्टरांच्या तज्ञ टीमने रुग्णाची सुरक्षितता, आराम आणि सहजतेला प्राधान्य देऊन पेन लेस टोटल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आणली आहे. डॉ. मुदित खन्ना हे मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अनुभवी जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन असून ते शस्त्रक्रियेत कमीत कमी चिरफाड होईल, असे तंत्र अंगीकारतात. बहुसंख्य रुग्ण हे मल्टिमोडल स्टेट ऑफ द आर्ट पेन पंट्रोल प्रोटोकॉलसह टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी करून घेत असल्याने त्यांना संपूर्ण वेदनारहित किंवा बऱ्याच अंशी वेदनारहित अनुभव येतो, असे डॉ खन्ना यांनी सांगितले.





























































