कराड तालुक्यातील अनेक संस्था दिवाळखोरीत

दीड वर्षात कराड तालुक्‍यातील अनेक वेगवगेळ्या सहकार क्षेत्रातील विविध संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. उपनिबंधक कार्यालयाने या संस्था दिवाळखोरीत असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये पतसंस्थांसह विविध सहकारी संस्थांचा समावेश आहे. मतदार याद्या न देणे, सरकारी कागदपत्रांची पूर्तता न करणे अशा क्षुल्लक कारणाने संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. या संस्था अवसायनात असल्याचे जाहीर करण्यात आल्याने सदर संस्थांचे कामकाजच ठप्प आहे.

कराड तालुक्‍यात 150 पेक्षा अधिक सहकारी संस्था आहेत. यातील मार्चपर्यंत 30 संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. चार-नागरी पतसंस्था, पाच- बिगर नागरी पतसंस्था, तीन- स्वयंरोजगार संस्था, चार- गृहनिर्माण संस्था, एक- पाणीपुरवठा संस्था, पाच- औद्योगिक संस्था, तीन- यंत्रमाग संस्था आणि अन्य पाच संस्थांचा समावेश आहे. या संस्थाकडून अतिशय क्षुल्लक चुका झाल्याने या संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. एप्रिल ते आजअखेर 23 संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. 2 ग्रामीण बिगरशेती पतसंस्था तर अन्य 21 नावीन्यपूर्ण संस्थांचा समावेश आहे. कराड तालुक्‍यात भाजपच्या काळात 38 नावीन्यपूर्ण संस्थांची नेमणूक झाली होती. त्यातील 21 संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. अन्य 17 संस्थांचे व्यवहार अद्यापही अपूर्ण आहेत. संस्थांनी तयार केलेल्या प्रकल्पालाही मान्यता नाही. त्यामुळे काही संस्था आर्थिक अडचणीत आहेत.

तालुक्‍यातील स्वावलंबनासह किरकोळ व्यवसाय सुरू करण्यासाठी, शेतीपूरक व्यवसायासाठी, शेतीमालाच्या गोदामासाठीही काही संस्था तयार झाल्या आहेत. या संस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. यामध्ये अनेक संस्थांनी ऑडिट पूर्ण केलेले नाही, काही संस्थांनी मतदार याद्यांकडे दुर्लक्ष केले आहे. काही संस्थांनी सरकारी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. काही संस्थांनी सरकार हवी असलेली माहिती दिलेली नाही. अशा अगदी क्षुल्लक कारणाने संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या