
पेटीएमने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीदरम्यान प्रबळ विकास गती कायम ठेवली आहे. पेटीएमने आपल्या व्यासपीठाच्या माध्यमातून 2.7 दशलक्ष कर्ज वितरण केले असून यात वार्षिक 414 टक्के वाढीची नोंद केली आहे. कर्ज वितरण मूल्य 13.2 बिलियन रुपयांवर पोहोचले असून यात वार्षिक 375 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या जीएमव्हीमध्ये वार्षिक 129 टक्के वाढ आणि एमटीयूमध्ये वार्षिक 36 टक्के वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये पेटीएमचा कार्यसंचनांमधून प्राप्त महसूल वार्षिक 64 टक्क्यांच्या वाढीसह 10,896 दशलक्ष रूपयांपर्यंत स्थिरगतीने वाढला आहे.

























































