शॉर्टसर्कीटमुळे मजूराच्या घराला आग, हजारोंचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

राहुरी तालुक्यातील येवलेआखाडा येथे विजेच्या शॉर्टसर्कीटमुळे मोलमजुरी करून उपजीविका भागविणार्‍या मजुराच्या छपरास आग लागुन ५० हजार रूपयांची रोकड,धान्य तसेच संसारपयोगी वस्तू जळुन खाक झाल्या आहेत.
शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास  येवलेआखाडा येथे जळीताची ही घटना घडली आहे. शेतमजुर भिका राणुजी पुलवळे आपल्या कुटूंबा समवेत छपरात बसलेले असताना विजेचे शॉर्टसर्कीट  होऊन आगीच्या ज्वाळा बाहेर पडल्या. छपराला आग लागताच पुलवळे आपल्या कुटूंबा समवेत बाहेर पळाल्याने जिवीतहानी टळली. या घटनेची खबर मिळताच नगरसेवक शहाजी जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण केले. तसेच परिसरातील शेतकर्‍यांनी आग विझविण्यासाठी मदतकार्य केले. दरम्यान आगीची तीव्रता मोठी असल्याने छप्पर तसेच आतील पैसे व संसारपयोगी वस्तू जळुन खाक झाल्या.   या घटनेची माहिती तहसीलदार व पोलीस प्रशासनाला देण्यात आली. मात्र सायंकाळ पर्यंत प्रशासनातील जबाबदार अधिकारी घटनास्थळी फिरकले नाहीत.