पेणमध्ये महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी शेकापच्या धैर्यशील पाटील यांचा तब्बल 23595 इतक्या मोठ्या मताधिक्क्यांनी पराभव केला आहे. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांना 111309 मते मिळाली तर धैर्यशील पाटील यांना 87714 मते  मिळाली आहेत.

या मतदार संघात १४ उमेदवार आपले नशीब आजमावत होते. यात भाजप , शेकाप, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि ९ अपक्ष असे उमेदवार उभे होते. मुख्य लढत ही शेकाप आणि भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार यांच्यात दुरंगी लढत झाली. भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी सुरवातीपासूनच आघाडी घेतली होती व ती अखेर पर्यंत राखण्यात ते यशस्वी ठरले.

या कारणांमुळे रविशेठ पाटील यांचा विजय झाला.

@ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेचा फायदा

@ शिवसेना, भाजप व रिपाइं यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन केलेला प्रचार

@ नगरपालिकेच्या माध्यमातून केलेला पेण  शहराचा विकास

@ शिवसेनेचे किशोर जैन, माजी आमदार अनिल तटकरे, माजी आमदार अवधूत तटकरे, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, जगदीश ठाकुर यांनी केलेल्या प्रयत्नांनमुळे

 @ ७१ टक्के मतदान झाले वाढलेला मतदानाचा फायदा

या कारणांमुळे झाला धैर्यशील पाटील यांचा पराभव 

@ पेण खारेपाट भागातील पाण्याचा प्रश्न,

@ पेण अर्बन बँकेचा प्रलंबित प्रश्न,

@ खराब रस्ते,

@ बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न,

@ राष्ट्रवादीने केलेला असहकार

@ महाआघाडीच्या नेत्यांनी तालुक्यात एकही सभा  न घेतल्याने