
पेणमध्ये एकाच दिवसात आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील मांगरूळ गावात जे 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यात 1 वर्षांची मुलगी आणि 2 वर्षांच्या 2 मुलींसह त्यांची आई देखील कोरोना बाधित झाली आहे. तर पेण शहरातील फणस डोंगरी भागात 32 वर्षांची महिला, 7 वर्षे,10 वर्षे,13 वर्ष असे तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आजच्या एकाच दिवसातील आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्या नंतर आता पेणमधील कोरोना बधितांची संख्या 23 झाली आहे. त्यापैकी 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 12 जण आणूनही विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दरम्यान हे आठ रुग्ण वास्तव्य करीत असणारे दोन्ही भाग कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तर हे आठही रुग्ण इंडिया बुल्स रुग्णालयात उपचार घेत आहेत




























































