अल्पवयीन मुलीला पळवणार्‍याला पेण पोलिसांनी केले गजाआड

crime

पेण शहरातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या सराईत गुन्हेगाराच्या पेण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पेण शहरातील साबर सोसायटी येथे राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीला त्याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराने फूस लावून गुरुवारी दुपारी 11: 30 च्या सुमारास पळविले. सदरचे प्रकरण मुलीच्या घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी पेण पोलीस स्टेशन गाठले. आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने पेणचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी त्वरित कारवाई करीत सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्यासह पोलिसांची टीम रवाना केली. यावेळी पोलिसांनी मोतीराम तळे परिसरातून आरोपीस व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी तत्परतेने कारवाई केल्याने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या