उरणमध्ये नियम मोडणाऱ्या 230 वाहन चालकांवर कारवाई

377
प्रतिकात्मक छायाचित्र

हिंदुस्थानने जम्मू कश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर देशात दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याने अनेक ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. उरण पोलिसांनी उरण चारफाटा येथे रविवारी नाकाबंदी करून वाहतूकीचे नियम तोडणाऱ्या 230 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

उरण येथील पोलिसांनी यावेळी 400 वाहनांची तपासणी केली, यामध्ये चारचाकी आणि दुचाकींचा समावेश होता. विना हेल्मेट, सीटबेल्ट नसणे, फॅन्सी नंबर प्लेट आदी प्रकारे नियम मोडणाऱ्या 230 वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात आली. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जगदीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक अतुल आहेर आणि पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी होते. यापुढेही बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या