नाबार्ड कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सुटणार, शिवसेनेच्या प्रयत्नांना यश

नाबार्डमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात स्थानीय लोकाधिकार समितीने नाबार्डच्या अध्यक्षांसोबत चर्चा केली. यावेळी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासंदर्भात नाबार्ड व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेतली.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांनी नाबार्डचे अध्यक्ष शाजी के. व्ही. यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीला नाबार्ड स्थानिक लोकाधिकार समितीचे अध्यक्ष कृष्णा घाटकर, सचिव मंगेश परब, कृष्णा मयेकर, उपाध्यक्ष रामचंद्र कांदळकर, अतुल वेदपाठक, दिगंबर वराडकर, विजय खांडरे, गजानन सलामे, निशिकांत पुरोहित, जयप्रकाश हळदणकर, सुनील जाधव, संजय वाघोदे, दीपक पालवणकर तसेच महासंघांचे संघटन सचिव दिनेश बोभाटे हे उपस्थित होते. बैठकीत सर्व मुद्द्यांवर नाबार्ड व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका दर्शवली.