चाईल्ड पॉर्न शेअर केल्याप्रकरणी मुंबईतील भाजीविक्रेत्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चाईल्ड पॉर्न शेअर केल्याप्रक्रणी मुंबई पोलिसांनी एका भाजी विक्रेत्याला अटक केली आहे. हरीप्रसाद पटेल असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अंधेरीहून अटक केली आहे.

हरीप्रसाद पटेल हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. अंधेरीत तो भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. एक वर्षापूर्वी त्याने फेसबुकवर लहान मुलाचा अश्लील व्हिडीओ अपलोड केला होता. या प्रकरणी पोलिसांनी अकाऊंट बंद करून गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुन्हा हरीप्रसादने मित्राच्या मोबाईलवरून नवीन फेसबुक अकाउंट उघडले आणि पुन्हा तसाच व्हिडीओ अपलोड केला. पोलिसांना माहिती मिळताच या प्रकरणी हरीप्रसादला अटक करण्यात आली आहे.

फेसबुकने चाईल्ड पोर्नोग्राफी विरोधात मोठी मोहीम उघडली आहे. फेसबुक आणि अमेरिकेच्या काही संस्था अशा युजरची माहिती पोलिसांन देते आणि पोलीस त्याविरोधात कारवाई करतात. गेल्या आठवड्यात पालघरमध्ये 28 जणांविरोधात चाईल्ड पॉर्न शेअर केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता.