झारखंडमध्ये गोमांस विकल्यावरून एकाची हत्या, दोघे जखमी

प्रातिनिधिक फोटो

बंदी घालण्यात आलेले गोमांस विकल्याचा संशय घेऊन झारखंडमधील खुंटी येथे संतप्त जमावाने तिघाजणांना बेदम चोप दिल्याची घटना घडली आहे. यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून तिसर्‍याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती डीआयजी एवी होमकर यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी काही ठिकाणी छापे मारले असून पाच ग्रामस्थांना पकडले आहे.

रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कर्रा पोलीस ठाण्यात माहिती मिळाली की, येथील काहीजण गोमांस विकत असून ग्रामस्थांनी त्यांना पकडून चोप द्यायला सुरुवात केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत ग्रामस्थांनी त्या तिघांना बदडले होते. यातील एकजण जागीच मरण पावला असून अन्य दोघांवर रांची येथील रुग्णालयात उपचार होत आहेत. यापूर्वी 18 जून रोजी झारखंडमधील सरायकेला-खरसावा येथे बाईक चोरल्याच्या संशयावरून जमावाने एका तरुणाला चोपले होते.

आपली प्रतिक्रिया द्या