अजबच! ‘ही’ व्यक्ती वर्षातले 300 दिवस झोपून राहते आणि झोपेतच जेवते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात काही लोकं दुर्मिळ आजाराचे शिकार झाल्याचे निदर्शनास येते. वैद्यकीय क्षेत्रापुढेही या आजारांचे आव्हान असते. असाच एक दुर्मिळ आजार राजस्थानातील एका व्यक्तिला जडला आहे. त्यांची पत्नी आणि आई यांनी ते या आजारातून लवकर बरे होतील, याची वाट पाहात आहेत.

राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील भादवा गावात राहणारे पुरखाराम (42) यांना गेल्या 18 वर्षांपासून दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे. सुरुवातील ते 5 ते 7 दिवस झोपून राहात असत, मात्र आता त्यांच्या झोपेचे दिवस वाढले आहेत. वर्षातून 300 दिवस ते झोपून राहतात. झोपेतून जाग आल्यानंतर त्यांना उठण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय त्यांना ते झोपेत असतानाच जेवण भरवतात.

पुरखाराम यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, एकदा ते झोपले की, दिवसभर झोपून राहतात. तेही 20-25 दिवस नाही, तर चक्क वर्षातले 300 दिवस ते झोपूनच राहतात. हळहळू त्यांचे झोपेचे प्रमाण वाढले. या दिवसांत काही महत्त्वाचे काम आले, तर त्यांना उठवण्याकरिता फारच कष्ट घ्यावे लागतात. त्यांच्या या आजाराची बातमी सर्वदूर पसरली आहे. झोपण्याच्या आजारामुळे दुरदूरच्या गावातील लोकं त्यांना ‘कुंभकर्ण’ या नावाने हाक मारू लागले आहे.

याबाबत पुखाराम सांगतात की, मला झालेल्या या दुर्मिळ आजाराचीच मला चिंता वाटते. डॉक्टरही हा आजार दुर्मिळ असल्याचे सांगत आहेत, पण मी यातून बरा होईन, अशी आशाही त्यांना आहे. त्यांची पत्नी लिछमीदेवी हिचे म्हणणे आहे की, गावात आमचे दुकान आहे, पण आजारपणा दुकान बंद ठेवावे लागते, कारण दुकानात काम करता करताच पुखाराम झोपतात. तसेच त्यांच्या वयोवृद्ध आईला पुखाराम आणि त्यांच्या मुलांच्या भविष्याविषयी चिंता वाटते.