
बोल्ड आणि बिनधास्त रणवीर सिंगने नुकतेच एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. रणवीर सिंगचे हे फोटोशूट व्हायरल झाल्यामुळे सगळीकडे तो चर्चेत होता. या फोटोशूटवरून बराच वाद झाला होता. काही राज्यांमध्ये रणवीरविरोधात तक्रारही करण्यात आली होती. मात्र बॉलिवूड मधील अनेक कलाकारांनी रणवीरच्या बाजूने उभे राहत त्याला पाठिंबा दिला. एकीकडे रणवीरला ट्रोल केले जात असताना, दुसरीकडे मात्र रणवीरला पुन्हा एकदा न्यूड फोटोशूट करण्याची ऑफर आली आहे. पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स म्हणजेच पेटा इंडियाने त्यांच्या ट्राय विगन मोहिमेसाठी रणवीरला न्यूड फोटोशूट करण्याची विनंती केली आहे.
पेट इंडियाने रणवीरला पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की, ‘आम्ही तुझे पेपर मॅगझिनमध्ये न्यूड फोटोशूट पाहिले आहे. आम्हाला आशा आहे की तू आमच्यासाठीही तुझी पॅन्ट काढशील. प्राण्यांबद्दल दया दाखवण्यासाठी, PETA इंडियाच्या जाहिरातीसाठी All Animals Have the Same Parts, Try Vegan या टॅगलाइनसह तू न्यूड फोटोशूट करशील का? आम्ही त्याच्या संदर्भासाठी तुला पामेला अँडरसनचा फोटो पाठवला आहे.
पेटा इंडियाने या पत्रात विगन असण्याचे फायदे स्पष्ट केले आहेत. तसेच रणवीरला पुढे येऊन या मोहिमेचा प्रचार करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता PETA च्या या विनंतीला रणवीर नेमका कसा प्रतिसाद देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पेट इंडियाच्या या विनंतीला रणवीरने सहमती दर्शविली तर चाहत्यांना पुन्हा एकदा रणवीरचे न्यूड फोटोशूट पाहण्याची संधी मिळणार आहे.






























































