पीटर मुखर्जीचा हायकोर्टात जामिनासाठी अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी याने जामिनासाठी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे मुखर्जीने आज हायकोर्टात अर्ज केला. पुढील आठवडय़ात या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

शीना बोरा हत्याकांडप्रकरणी आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या पीटर मुखर्जीची बायपास सर्जरी झाली असून तुरुंगात आजारपण बळावण्याची शक्यता असल्याने आपल्याला सोडून देण्यात यावे यासाठी विशेष सीबीआय कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. सीबीआय विशेष कोर्टाचे न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांनी 4 एप्रिल रोजी हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर छातीत दुखत असल्याने 17 मार्च रोजी मुखर्जीला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आजारपणाचे कारण देत पीटर मुखर्जीने जामिनासाठी आता मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर पुढच्या आठवडय़ात सुनावणी होण्याची शक्यता आहे.