
अदिती सारंगधर,[email protected]
आपण नेहमीच हॉटेलिंग करतो… मज्जा करतो… पण आपले जीवलग… ते मात्र आपली वाट पाहत घरातच थांबलेले असतात… पण आता या बाळांसाठी कॅफेज् सुरू झाली आहेत… तिथे त्यांनाही धम्माल, मस्ती करता येते.. ट्रीटस् घेता येतात…
‘बापरे… लिहिता लिहिता, वाचता वाचता, बोलता बोलता आपल्या या सहप्रवासाला दहा महिने झालेसुद्धा… 10 गुणिले 4 म्हणजे 40 माणसं, त्यांची 40 नवीन बाळं… एकेकाच्या अनेक तऱहा, नखरे, लाड, आवडीनिवडी, लाइफस्टाइल, राहणीमान, मज्जा मस्ती, ओरडा, औषधं, नाटकं, रुसवे फुगवे कित्ती कित्ती मज्जा आली मला… बघता बघता जुनं वर्ष सरतंय… नवीन वर्ष येऊ घातलंय. जोमात, जोशात, जल्लोषात आपण स्वागत नक्कीच करूया त्याचं… पण एक संकल्प करूयात का सगळे मिळून ‘जीवलग’चे सगळेच वाचक… प्राण्यांना त्रास होईल असे मोठ्ठय़ा आवाजातले फटाके… लाऊडस्पीकर्स टाळण्याचा संकल्प करूया.

आता म्हणाल ही बाई वर्षाच्या सुरुवातीला आणि आर्टिकलच्या सुरुवातीलाच डोस पाजायला लागली वगैरे… पण जर काही व्यक्ती आऊट ऑफ दी बॉक्स आणि वे जाऊन त्यांच्यासाठी कॅफे वगैरे सुरू करत असतील तर आपण एवढं तरी करूच शकतो ना…
अहं… आज कुणी सेलिब्रेटी वगैरे नाही. आज गमतीशीर अनुभव आहेत पेट कॅफेचे… तर आता काय हे पेट कॅफे वगैरे… अहो आपण नाही का, ‘चल एक एक कॉफी म्हणून जॉइंट वर तासनतास गप्पा मारत बसतो… तसं आपल्या फ्युरी बॉईजना नवे मित्र, नव्या मैत्रिणी मिळाल्या. पेट स्पेशल चिकन सूप पिता पिता… तर हरकत कुठे आहे?
तायपई… तैवानमध्ये जगातलं पहिलं पेट कॅफे सुरू झालं. फ्लॉवर गार्डन. आता ‘कॅफे ऍण्ड कॅट्स’ नावाचं… आपल्याकडे असणारे पेट्स बाहेरून आपण आलो की उडय़ा मारतात. आपण त्यांना गोंजारतो. वॉकला नेतो. अधूनमधून ट्रीट्स देतो. ड्राईव्हवर नेतो. पण याही पलिकडे कॅफेमध्ये त्यांना वॉकर छान लाँग वॉकला घेऊन जातो. या सेंटरमध्ये तुमच्या पेट आणि त्याच्या ब्रीडनुसार सूट होणारे एक्सरसाईज, खेळ असतात. त्यांना आवडणाऱया त्यांच्या हेल्थला पूरक असणाऱया, न्यूट्रीशनयुक्त वेगवेगळ्या रेसिपीज असतात. फ्रेश फ्रेश त्यांना करून खायला घातलं जातं. वेगवेगळे पेट्स फ्रें
डली केक, डिझर्ट्स असतात. त्यांना क्लिनिंगपासून स्पापर्यंत लागणाऱया सगळ्या गोष्टी, हेअरस्टाइल, हेअर कट… विचारू नका. थोडक्यात त्या पेटची चांदी असते पेट कॅफेमध्ये.
मुंबईमधलं पहिलं पेट कॅफे आहे वर्सोव्याला. ‘कॅट कॅफे’… अर्थात त्या पेटबरोबर पेटच्या पालकांना, त्यांच्या फ्रेंड्सनासुद्धा कॅफेमध्ये तेथे असणाऱया प्राण्यांसोबत फोटो काढायचीही परवानगी असते. लहान मुलांना कसं पार्कमध्ये, मॉलमध्ये खेळायला घेऊन जातो, तसं पेट्सनासुद्धा घेऊन जायचं ही संकल्पनाच गोड आहे ना? पण नुसती परवानगी मिळाली आणि कॅफे उघडलं असं नाही चालत. काही बेसिक स्टॅण्डर्ड्स मेन्टेन करावी लागतात. नियम पाळावे लागतात. ऑनिमल वेल्फेअरच्या नियमानुसार हायजिन, स्वच्छता, स्वच्छ आणि ताजे अन्न आणि तेथे असणाऱया कॅफेच्या पेट्सचं व्हॅक्सिनेशन्स आणि न्यूट्रीशनिंग झालेलं असावं.
मुंबईतील वर्सोव्यात एका कॅफेला ऑनिमल ऑक्टिव्हीस्टच्या एका समूहाने सुरू केलं. आजही अनेक कॅट्स तेथे येतात. रस्त्यावरच्यासुद्धा… त्यांचं औषधपाणी, हेल्थ चेकअप केलं जातं. त्यांना फॉस्टर केलं जातं. योग्य घर शोधलं जातं. त्रासात असणाऱया अनेक प्राण्यांना वाचवून येथे आणून ठेवलं जातं. ज्या घरात तिथलं बेबी जाणार आहे त्या घराची परिस्थिती, त्याच्या होणाऱया पालकांच्या नियमित मुलाखती, स्वच्छता आणि हे सगळं रीतसर सहीसकट होतं. गरजेला वेळोवेळी एक मदतनीस कधीही हजर तत्त्वावर असतो. हे सगळं त्या बाळाला उत्तम घर मिळावं आणि प्राण्यांना दुखापत होऊ नये यासाठी एक्झाटली… बाळाला दत्तक घेताना करावे लागते तसे सगळे सोपस्कार इथेही आहेतच. पण एका छत्राखाली सगळं काही… असंच ही कॅफे आहेत. अहो, गमतीची गोष्ट अशीही की पेट कॅफेसुद्धा लग्न जुळलीयेत… खरंच!
सहजच एका कॅफेमध्ये गेले होते. तेथे एक मुलगी पुस्तक वाचत बाजूला आपल्या फरी बोका खेळत ठेवून बसली होती. ‘मे आय डिस्टर्ब यू’ म्हणून जे आमचं सुरू झालं ते ‘पुढच्या आठवडय़ात आपण कॉफी प्यायला जाऊ’ला संभाषण संपलं. मला एक नवी मैत्रीण मिळाली. सॅण्ड्रा.
एका माणसाने पेट कॅफेच्या संदर्भात बोलताना सांगितलं, घरी एकटा असतो. काही वर्षांपूर्वी अपघातामध्ये अधू झालो. माझ्या 7 वर्षांच्या जर्मन शेफर्डला मीच वॉकला न्यायचो. पण इतर कुणाबरोबर तो जाईना. मग रिक्षात टाकून सरळ या कॅफेमध्ये आणतो. इथं आणल्यावर मी बरोबर आहे म्हणून इथल्या वॉकरबरोबर फिरायला जातो.
खूपच तरुण मुलामुलींचा घोळका होता बाजूला बसलेला… त्यांच्यात संवाद सुरू होता. चेरीची शस्त्रक्रिया झाल्यापासून ती एकदम निराश असायची. येणाऱया जाणाऱयावर भुंकायची. पण तुझ्या रॉकीबरोबर मस्त दोस्ती झालीये… नशीब अजून रागानं गुरगुरली किंवा चावली नाहीय त्याला…
इतक्यात ‘एक चिकन सूप देना, उसमें रॉयल कॅनन के नगेट्स डालना और थोडा पानी कम रखना… नहीं तो थंडी में 4 बार सू सू के लिए नीचे लेकर जाना पडेगा’… ऐकू आले. असे खूप अनुभव घ्यायला वरचेवर मला झोरोला घेऊन त्या कॅफेमध्ये जायला हवंय. हवंच आहे. तूर्तास… 1) पॉवरफूल लाईफ, 2) कॅट कॅफे स्टुडिओ, 3) कॅफे पेट्स, 4) गोस्ताना, 5) दी बॅगल शॉप… ही मुंबईतल्या पेट्स कॅफेची काही नावं. तुमच्या जीवलगासाठी. बाकी तो चलते रहेगा… नया साल आएगा और हम भी मिलते रहेंगे मित्रों…
हॅपी न्यू इयर… हे वर्ष आपण पेट फ्रेण्डली करूया… वागूयात!…‘

























































