उत्तर प्रादेशिक विभागात फोन झाले ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रादेशिक विभागातील (आरे ते दहिसर) काही पोलीस ठाण्यात आणि नियंत्रण कक्षातील दोन लाईन बंद असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहेत. आपत्कालीन वेळेत नेमका कोणाला फोन करायचा असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. बंद असलेल्या पोलीस ठाण्यातील लँड लाईन नंबर लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुंबईतील उत्तर प्रादेशिक विभाग आरे ते दहिसर हा प्रमुख मानला जातो. बहुतांश झोपडपट्टय़ा आणि निवासी इमारती या परिसरात आहेत. आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आकसा, गोराई, माईंड स्पेस येथे आहे. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग येथून जात असून दररोज लाखो वाहने ये-जा करत असतात. या विभागात गुह्याचे प्रमाण देखील हळुवार वाढत आहे. चोऱया, घरपह्डी, अपघात, भांडण, हाणामारी, नशेबाजाच्या तक्रारीसाठी नागरिक पोलीस ठाण्यात पह्न करतात. मात्र गेल्या काही दिवसापासून उत्तर प्रादेशिक विभागातील काही पोलीस ठाण्यातील आणि नियंत्रण कक्षातील दोन लाईन बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

काही नागरिक हे थेट नियंत्रण कक्षात फोन करण्यास घाबरतात. तक्रार केल्यास आपला नंबर समोरच्या व्यक्तीला कळेल या भीतीने ते पोलीस ठाण्याच्या लँड लाईनवर पह्न करतात. या विभागातील काही पोलीस ठाण्याचे नंबरची लाईन बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. त्यातच काही पोलीस ठाण्याच्या नंबरवर फोन केल्यास बेल वाजते. मात्र कोणी फोन उचलत नसल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. एखादी घटना घडल्यावर आपत्कालीन वेळेत पोलिसांना फोन केल्यावर नंबर बंद येत असल्यास नेमका कोणाला संपर्क साधायचा असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.