Photo – ‘गर्ल्स गँग’सोबत दिसली जान्हवी कपूर, डोंगरांवर फिरताना कॅमेऱ्यात कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर सक्रिय असते आणि चाहत्यांना प्रत्येक गोष्टीचे अपडेट देत असते. तिचे फॅशन स्टेटमेंट असो किंवा वर्कआऊट, येणारा प्रोजेक्ट असो किंवा हॉलिडे असो, प्रत्येक वेळी ती सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत असते.

janhvi-kapoor

नुकतेच जान्हवी कपूर हिने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यात ती आपल्या गर्ल्स गँगसोबत डोंगरावर फिरताना दिसतेय.

janhvi-kapoor1

जान्हवी कपूर डोंगारावर निसर्गाच्या सानिध्यामध्ये ताज्या हवा खाताना दिसत आहे. फोटोच्या बॅकग्राउंडला हिरवी झाडे, ढग आणि हिरवाईने नटलेल्या डोंगर-दऱ्या दिसत आहेत.

janhvi-kapoor3

या फोटोंसोबत जान्हवी कपूर हिने keep me where the light is असे कॅप्शनही दिले आहे. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

janhvi-kapoor2

वर्कआउटबाबत बोलायचे झाले तर जान्हवी कपूर सध्या ‘गुड लक जेरी’चे चित्रिकरण करत आहे. तसेच रणवीर सिंह, विक्की कौशल, करीना कपूर-खान, आलिया भट्ट, अनिल कपूर आणि भूमी पेडनेकर यांच्यासोबत ती ‘तख्त’ चित्रपटातही दिसणार आहे.