1 / 10
3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची 189वी जयंती आहे. 1 जानेवारी 1848 रोजी फुले दांपत्याने पुण्यात मुलींची पहिली शाळा उघडली होती. या निमित्ताने महात्मा फुलेंचे वास्तव्य ज्या वाड्यात होतं, त्या ऐतिहासिक वाड्याची सफर
पुण्यातल्या महात्मा फुले पेठेत हा वाडा आहे. या पेठेला गंज पेठ असंही म्हणतात. कौलारू छपराचा हा वाडा आहे.
वाड्याच्या अंगणात असलेली हीच ती ऐतिहासिक विहीर. सार्वजनिक पाणवठ्यावर जायला मनाई असलेल्या अस्पृश्य आणि गोरगरीबांसाठी फुले यांनी आपली खासगी विहीर खुली केली होती.
























































