Photo – हिंदमाता व वरळी भागातील परिस्थितीची आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी

सर्व फोटो - रुपेश जाधव

हिंदमाता, शीव, किंग्जसर्कल, अंधेरी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ते सेवा कोलमडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी हिंदमाता व वरळी भागातील परिस्थितीची पाहणी केली.

(सर्व फोटो – रुपेश जाधव)

रविवार (25 मे 2025) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे.

मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी उद्घाटन झालेली मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रो सेवेचा तर बोजवारा उडाला आहे.

मेट्रो स्थानकात पाणी साचून सेवा ठप्प झाली आहे.