Photo – शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीचा प्रचाराचा धडाका, उद्धव ठाकरे यांच्या शाखाशाखांना भेटी आणि कार्यकर्त्यांशी संवाद

शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीने प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून मतदारांचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील शाखा भेटी घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज माहीम विधानसभा क्षेत्रातील शाखा भेटीदरम्यान कार्यकर्ते, मतदारांशी संवाद साधला.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रभाग क्र. 182 मधील शिवसेना उमेदवार मिलिंद वैद्य यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी पारंपरिक कोळी टोप्या घालत त्यांचे जल्लोषी स्वागत करून विजयाचा निश्चय केला. यावेळी शिवसेना नेतेखासदार अनिल देसाई उपस्थित होते.

 

 प्रभाग क्र. 200 च्या उमेदवार उर्मिला पांचाळ यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाला
रश्मी ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.

 

माहीम विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र. 191 च्या शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी युतीच्या उमेदवार विशाखा राऊत यांच्या निवडणूक कार्यालयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कार्यकर्ते, मतदारांशी संवाद साधला. यावेळी तेजस ठाकरे, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई उपस्थित होते.

 

शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीचे प्रभाग क्र. 192 चे उमेदवार यशवंत किल्लेदार यांच्या निवडणूक कार्यालयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी तेजस ठाकरे, शिवसेना नेतेखासदार अनिल देसाई, शिवसेना सचिवआमदार मिलिंद नार्वेकर, आमदार महेश सावंत, मनसे नेते अमेय खोपकर आदी उपस्थित होते.

 

शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी युतीच्या प्रभाग क्र. 190 च्या उमेदवार वैशाली पाटणकर यांच्या पक्ष कार्यालयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी तेजस ठाकरे, शिवसेना नेतेखासदार अनिल देसाई, विभागप्रमुखआमदार महेश सावंत, उपनेते साईनाथ दुर्गे, राजू पाटणकर उपस्थित होते.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विक्रोळी मतदारसंघांमधील शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखांना भेटी दिल्या. यावेळी उमेदवार श्वेता पावसकर, आमदार सुनील राऊत, बाबा कदम यांच्यासह हजारो शिवसेना आणि मनसैनिक उपस्थित होते

 

 

शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्र. 16 च्या उमेदवार स्वाती बोरकर यांच्या गोराई येथील प्रचार फेरीत माजी आमदार विलास पोतनीस यांनी सहभाग घेतला. यावेळी विधानसभा प्रमुख शरयू भोसले, विधानसभा संघटक प्रवीण प्रधान, विधानसभा समन्वयक मीनाक्षी चांदोरकर, शाखाप्रमुख विपुल दारूवाले, प्रेरणा राणे, ग्राहक संरक्षण कक्ष संघटक संतोष कोठारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी प्रकाश माने उपस्थित होते.

 

 

प्रभाग क्र. 125 मधील शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश पवार यांच्या भव्य प्रचार यात्रेत विधानसभा कार्यालय प्रमुख प्रकाश वाणी, उपविभागप्रमुख अजित भायजे, शिक्षकेतर कर्मचारी सेना राज्य सचिव सचिन भांगे, शाखाप्रमुख मयूरेश नामदार यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते