Photo – शिवशक्तीच्या प्रचाराचा धडाका

शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे प्रभाग क्र. 208चे उमेदवार रमाकांत रहाटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रभाग क्रमांक 4चे युतीचे उमेदवार राजू मुल्ला यांच्या प्रचारसभेला शिवसेना उपनेते राजपुमार बाफना यांच्यासह संदेश शिरसाट, किरण तावडे, पंकज कांगणे, नवनाथ गीते, सुधीर पार्सेकर, रोशन राऊत, राजेश पाटील, संजय कोरगावकर, रोशन कपूर, राजेश बेटकर तसेच शिवसैनिक, मनसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 

प्रभाग क्र. 117 मधील शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीचे उमेदवार श्वेता पावसकर यांच्या पदयात्रेत शिवसेना सचिव आदेश बांदेकर आणि आमदार सुनील राऊत यांनी सहभाग घेतला. यावेळी बाबा कदम, मनोज चव्हाण, प्रथमेश धुरी, विनोद हाडे, मानसी मिठबांवकर, रवींद्र महाडिक, गणेश आण्णामुळे, दीपाली पाटील, प्रभू गवस, अरविंद नागनुरी, सुषमा वर्दम, मधुकर कदम, बाळा कर्पे, सुधाकर पेडणेकर, दिलीप पेडणेकर, अल्पिता वारंग, विलास मोरे, भारती शिंगटे, लीना मांडलेकर, अभिलाष पवार, पूनम साळवी, शुभांगी शिंदे, अस्मिता शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.