
प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांची मुलगी असलेली मसाबा गुप्ता हिने गेल्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये तिची वेगळी जागा निर्माण केली आहे. मसाबा ही एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर तर आहेच सोबत ती आता अभिनय क्षेत्रात देखील उतरली आहे.

गेल्या वर्षी मसाबाची मसाबा मसाबा ही वेबसिरीज जबरदस्त गाजली होती. यात मसाबा सोबत तिची आई नीना गुप्ता देखील होती.

मसाबाचे मधू मंतेना वर्मा सोबत लग्न झाले होते. मात्र हे लग्न फार काळ टिकले नाही. त्या दोघांचा घटस्फोट झाला आहे.




























































