
घरात घुसून महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 7 एप्रिल तसेच चार-पाच महिन्यांपूर्वी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी येथे घडली. पीडित महिलेने 24 एप्रिल 2026 रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, श्याम महाराज राठोड, राहुल सुरेश चोरडीया, कानीफनाथ गुलाबराव घुले, युवराज खरमाटे यांच्यासह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 7 एप्रिल रोजी आरोपी पीडितेच्या घरात आले. पीडित महिलेचे मंगळसूत्र काढून आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.




























































