सकाळी पायनापल शिरा, दुपारी श्रीखंडपुरी, संध्याकाळी आमरस; मजुरांच्या ताटात मिष्ठान्नाचा मेनू

3418

वाशी येथील सिडको एक्झीबिशन मधील निवारा केंद्रांत ठेवलेल्या सुमारे ३०० मजुरांचा पाहुणचार सध्या मोठ्या थाटामाटात सुरू आहे. या नागरिकांना सकाळी नाष्ट्यामध्ये पायनाल शिरा, उपमा, पोहे, दुपारच्या जेवणात श्रीखंड पुरी, छोले मसाला, संख्याकाळच्या जेवणात आमरस पुरी, गुलाबजाम, आदी मिष्टांन्नाचे ताट येत आहे. लॉकडाऊनमध्ये गावी जाण्याच्या तयारीत असलेल्या या नागरिकांची व्यवस्था एखाद्या लग्नाला आलेल्या पाहुण्यांसारखी होत असल्याने येथील जेवणावळीची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे.

राज्य सरकारने लॉकडाऊन घोषीत केल्यानंतर आपल्या गावाकडे निघालेल्या नागरिकांना वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कर्नाटक आणि उत्तरप्रदेशमधील मजुरांचा समावेश आहे. लॉकडाऊनच्या काळात या निवारा केंद्रातील जबाबदारी डी-व्हाईस एसएसव्ही ब्रॉडबॅन्ड प्रा. लि. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भुपेश गुप्ता यांनी घेतली आहे. गुप्ता यांच्या माध्यमातून निवारा केंद्रातील ३०० आणि आसपासच्या १०० नागरिकांची दररोज जेवणाची व्यवस्था केली जात आहे. एखाद्या लग्न समारंभाप्रमाणे दररोज या ठिकाणी जेवणावळी उठत आहेत. दररोजच्या जेवणात वेगवेगळे मेनू असून त्यामध्ये पायनापल शिरा, जिलेबी, गुलाबजाम, श्रीखंडपुरी, आमरस पुरी, पनीर, छोले मसाला आदींचा समावेश आहे. हे सर्व जेवण शिरवणे एमआयडीसीमधील एका वंâपनीमध्ये तयार केले जात असून त्याचे शिस्तबध्द पध्दतीने या नागरिकांना वाटप केले जात आहे. त्यासाठी गुप्ता यांची सुमारे ३० जणांची टीम काम करीत आहे. त्यामध्ये रिटायर्ड पोलीस असोसिएशनचे अध्यक्ष श्रीराम गोरे, माजी नगरसेवक राजु शिंदे यांचाही समावेश आहे.

परिस्थिती गंभीर, आम्ही खंबीर

निवारा केंद्रात ठेवण्यात आलेल्या सर्वच नागरिकांसाठी कपड्यांची व्यवस्थाही वंâपनीच्या वतीने करण्यात आलेली आहे. सध्याची परिस्थिती गंभीर असली तरी आम्ही खंबीरपणे तिला सामोरे जात आहोत. कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दररोज ४०० जणांनाचे अन्न तयार करतो. या निवारा वेंâद्रातील नागरिकांची संख्या वाढली तरी त्यांचेही अन्न तयार करण्याची तयारी आम्ही ठेवली आहे, अशी प्रतिक्रिया भुपेश गुप्ता यांनी व्यक्त केली.

ऐरोलीत जेवणावळ

लॉकडाऊनमुळे ऐरोली परिसरात अडकून पडलेल्या शेकडो नागरिक अडचणीत आले आहेत. त्यांची उपासमार होऊ नये यासाठी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या माध्यमातून ऐरोली, चिंचपाडा आणि इलठणपाडा येथे अन्नदान केले जात आहे. सुमारे ५०० जणांची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. नेरुळ येथील सेक्टर २७ मध्ये वर्षा नाथ यांच्या माध्यमातून दररोज शेकडो नागरिकांचे जेवण तयार करून ते एलपी जंक्शन परिसरातील झोपडपट्टीत वाटले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या