
पिरामल फाऊंडेशनचा लोकोपकारी आरोग्य सेवा विभाग पिरामल स्वास्थ्य आणि एमयूएफजी बँक लिमिटेड यांनी महाराष्ट्रात मोबाईल आरोग्य सेवा उपक्रम – ‘समर्थ’ सुरू करत असल्याची घोषणा नुकतीच केली. मुंबई व पुण्यातील 96 शहरी झोपडपट्टय़ांमधील जवळपास 20 लाख लोकांना मोबाईल मेडिकल युनिट्समार्फत अधिक चांगल्या सार्वजनिक आरोग्य सेवा देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्पेशालिस्ट कन्सल्टेशन, प्रयोगशाळा परीक्षणे व औषधे या सेवा एमएमयूमार्फत निशुल्क पुरवल्या जाणार आहेत. त्याचबरोबर कोरोनाबाबत जनजागृती करणे, ट्रकिंग, सक्रिय देखरेख आणि क्वारंटाईन सेंटर्सवर फॉलोअप या सेवा दिल्या जाणार आहेत.



























































