कामाच्या बहाण्याने तरुणीला दाखवले पॉर्न, आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये प्लेसमेंट एजन्सी चालवणार्‍या व्यक्तीने एका तरुणीला नोकरीसाठी बोलवले. तिला काम दाखवण्याच्या बहाण्याने पॉर्न क्लिप दाखवली. तसेच नोकरीच्या बदल्यात त्याने सेक्स करण्याची मागणी केली. तरुणीने तिथून पळ काढत पोलीस स्थानकात पोहोचली आणि या व्यक्ती विरोधात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल करून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोपाळमधील 21 वर्षीय तरुणीने वाणिज्य शाखेची पदवीधर होती. ही तरुणी नोकरीच्या शोधात होती, मंगळवारी तिने एपी नगरमधील एका खाजगी प्लेसमेंट एजन्सीमध्ये नोकरीसाठी संपर्क केला. एजन्सीने कंपनीचे संचालक रुद्र प्रताप सिंह यांची भेट घेण्यास तरुणीला सांगितले. तरुणी एजन्सीमध्ये पोहोचल्यानंतर तिच्याकडून 100 रुपये नोंदणी शुल्क आकारले गेले आणि दुसर्‍या दिवशी मुलाखतीसाठी बोलावण्यात आले.

तरुणी बुधवारी मुलाखातीसाठी एजन्सीमध्ये पोहोचली. तेव्हा रुद्र प्रतापने तिची मुलाखत घेतली आणि नोकरी देण्याची शाश्वती दिली. नंतर काम समजवण्यासाठी रुद्रने तरुणीला कॉम्प्युटर वर बसण्यास सांगितले. रुद्रने कॉम्प्युटरवर पॉर्न सुरू केले आणि तरुणीशी लगट करून अश्लील बोलण्यास सुरूवात केली. तरुणीने याचा विरोध केल्यावर रुद्रने पॉर्न बंद केली. नंतर रुद्रने नोकरीच्या बदल्यात तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली.

पीडित तरुणीने तिथून काढता पाय घेतला आणि आपल्या मित्राला झालेली हकीगत सांगितली. दोघांनी मिळून पोलीस स्थानक गाठले आणि रुद्र प्रताप सिंह विरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रुद्र प्रताप सिंहला अटक केली.  सुरूवातीला आपण नव्हे तर आपल्या सहकर्माचार्‍याने हे कृत्य केल्याचा त्याने बनाव केला. पण जेव्हा तरुणीने आरोपीचे ओळख पटवली तेव्हा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे मूळ नाव हे मनोज चौहान आहे. तसेच विजिटिंग कार्डवरही खोटे नाव लिहिले आहे. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी असे केल्याचे त्याने सांगितले.