ऑडोमोसचे झाड लावा.. डासांना पळवून लावा..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळ्याची चाहुल जशी आपल्याला लागते. तशीच ती डासांनाही लागलेली असते. हिवाळ्यात कमी प्रमाणात सापडणारे डास उन्हाळ्यात मात्र हैराण करतात. त्यांच्यामुळे झोपही होत नाही आणि आजारांना सामोरे जावे लागते. त्रासदायक डासांना पळवून लावण्यासाठी अगरबत्ती, मॉर्टीन लिक्वीड कामी येते. पण ते खर्चिकही असते. शिवाय अगरबत्तीच्या धुरामुळे बऱ्याचजणांना श्वास घ्यायला त्रास होतो. आज एक असा उपाय पाहुया जो निसर्गाने निर्माण केलाय .

तुम्हालाही डासांपासून दूर राहण्यासाठी घरगुती आणि नैसर्गिक उपाय वापरायचा असेल. तर तुम्ही घरात ‘ओडोमास’ वनस्पती लावू शकता. ही सिट्रोनेला वनस्पती म्हणूनही ओळखले जाते. ही झाडे 2 ते 3 फूट उंचीची असल्याने घराच्या अंगणातही लावता येतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या झाडांना रोज पाणी देण्याची गरज नाही. ओडोमासच्या झाडाची पाने अंगावर चोळल्याने किंवा त्याचे तेल वापरल्याने डास दूर राहतात. याच्या तेलाचा उपयोग इतर अनेक रोगांवरही होतो.