पंतप्रधान मोदींनी अजमेर दर्ग्यासाठी पाठवली चादर; सोशल मीडियावर फोटो केला पोस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pm modi Met a Muslim community delegation

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी एक X वर एक पोस्ट टाकली आहे. यामध्ये चार फोटो अपलोड करण्यात आले आहेत ज्यात पंतप्रधान मोदी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेताना दिसत आहेत. तसेच दर्ग्यावर चढवण्यासाठी सोबत पवित्र चादर भेट देताना दिसत आहेत.

आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणातात की, ‘मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. आमच्या भेटीदरम्यान, मी पवित्र चादर सादर केली, जी ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उर्स दरम्यान अजमेर शरीफ दर्गा येथे ठेवली जाईल’.

या प्रसंगी केंद्रातील अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी आणि अन्य भाजप पदाधिकारी देखील उपस्थित होते.