पुलवामा हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून निषेध, शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 30 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याची पंतप्रधान मोदींनी दखल घेतली असून त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असे मोदींनी म्हटले आहे. तसेच शहीदांच्या कुटुबीयांसोबत संपूर्ण देश आहे व जखमी जवानांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.

तसेच मोदींनी गृहंमंत्री राजनाथ सिंग आणि इतर अधिकार्‍यांशी चर्चा करून याबाबत माहितीही घेतली आहे.