#G7Summit मोदी-ट्रम्पची संयुक्त पत्रकार परिषद, वाचा महत्त्वाचे मुद्दे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फ्रान्सच्या बोलरित्झमध्ये सुरू असलेल्या जी -7 देशांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेतली आहे. या भेटीनंतर दोघांमध्ये एक संयुक्त पत्रकार परिषदही झाली. वाचा या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे –

  • हिंदुस्थान आणि पाकिस्तानचे मुद्दे द्विपक्षीय, कोणत्याही देशाला यासाठी कष्ट घेण्याची आवश्यकता नाही – मोदी
  • आरोग्य, गरीबी, शिक्षणाचा अभाव या मुद्द्यांविरोधात दोन्ही देश मिळून लढूया – मोदी
  • 1947 पूर्वी दोन्ही देश एकत्रच होते. त्यामुळे दोन्ही देशातील समस्या सारख्या आहेत. त्या चर्चेने सोडवण्यात येतील – मोदी
  • दोन्ही देश चर्चेने समस्या सोडवतील आणि दोन्ही देशांच्या हिताच्या निर्णय घेण्यात येईल – मोदी
  • हिंदुस्थान-अमेरिका हे लोकशाही देश आहेत. अनेक क्षेत्रात दोन्ही देश एकत्र आल्यास खूप काही साध्य करू शकतात – मोदी

  • नरेंद्र मोदी, इम्रान खान यांच्याशी चांगले संबंध – ट्रम्प
  • कश्मीर मुद्द्यावर मध्यस्थीचा करण्याच्या विधानावर ट्रम्प यांचा यू-टर्न
  • दोन्ही देश आपापसातील मुद्दे समजूतदारपणे सोडवतील अशी आशा – ट्रम्प
  • रविवारी कश्मीर मुद्द्यावर चर्चा झाली. मोदींनी यावर नियंत्रण असल्याचे सांगितले – ट्रम्प

ऐका संपूर्ण पत्रकार परिषद –