पंतप्रधान मोदी दैवी, त्यांच्यात अशक्यही, शक्य करण्याची शक्ती; राज्यपाल आचार्य देवव्रत यांना साक्षात्कार

जेव्हा अन्याय वाढतो, तेव्हा दैवी लोक अवतार घेतात. अशा लोकांमध्ये अशक्य कामही शक्य करण्याची शक्ती असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय सामान्य माणसाच्या आवाक्यातले नाहीत, असे निर्णय एखादी दैवी व्यक्तीच घेऊ शकते, असे, विधान महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

राजभवनात आयोजित ‘मोदीज मिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी गीतेतील श्लोकाचा दाखला देत पंतप्रधान मोदींची तुलना दैवी अवताराशी केली जेव्हा समाजाला एखाद्या महापुरुषांची गरज असते त्यावेळी असे लोक देवलोकातून येतात. या लोकांमध्ये अशक्य काम शक्य करण्याची शक्ती असते. त्यामुळेच 370 कलम रद्द झाले. हा संवेदनशील विषय मोदींनी एका झटक्यात संपवला. मोदींच्या नेतृत्वामुळे जगभरात हिंदुस्थानची प्रतिष्ठा वाढत असल्याचे राज्यपाल म्हणाले.