
75 व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी अनेक योजना आणि मिशनचा उल्लेख केला. आपल्या 88 मिनिटांच्या भाषणात मोदींनी कोरोना लसीकरण, औद्योगिक विकास, जलजीवन मिशन, ऑलिम्पिक मध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी केलेली उत्कृष्ट कामगिरीवर प्रकाश टाकला. तसेच यावेळी मोदींन देशाला सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास नवा नारा दिला आहे.
फाळणीचा उल्लेख
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपण स्वातंत्र्या उत्साह साजरा करत आहोत. आजही देशवासियांच्या हृदयात फाळणीचे दुःख आहे. 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी भयावह स्मृतीदिन म्हणून पाळला जाईल असे मोदी म्हणाले.
कोरोना योद्ध्यांची प्रशंसा
या वेळी पंतप्रधान मोदी यांनी कोरोना योद्ध्यांची प्रशंसा केली. मोदी म्हणाले की, “कोरोना महामारीत आमचे डॉक्टर्स, नर्स, स्वच्छता कर्मचारी, लसीकरणात सामील झालेले कर्मचारी हे कौतुकास पात्र आहेत.”
हिंदुस्थानात जगातील सर्वात मोठे लसीकरण
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगात सर्वात मोठे लसीकरण हिंदुस्थानात राबवले गेले. जर हिंदुस्थानकडे लस नसल्या असत्या तर काय झाले असते? आज देशात ५४ कोटींहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे असे मोदी म्हणाले.
सबका विश्वास और सबका प्रयास
पंतप्रधान मोदींनी देशाला नवा मंत्र दिला. सबका सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास और सबका प्रयास’ या मंत्राने आपले लक्ष्य पूर्ण करायचे आहेत असे मोदी म्हणाले.
ऑलिम्पिक खेळाडूंनी दिली प्रेरणा
ऑलिम्पिक खेळाडूंनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडात केला. तसेच या खेळाडूंनी आपले हृद जिंकले आहे आणि देशातील युवा पिढीला प्रेरणा दिली आहे असेही मोदी म्हणाले.




























































