ग्लोबल वॉर्मिंगबाबत आता चर्चेची नाही; कृतीची वेळ आली आहे – पंतप्रधान मोदी

450

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्र संघात जागतिक हवामान बदलांवरील (ग्लोबल वॉर्मिंग) परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी मत मांडले. पर्यावरण रक्षणासाठी हिंदुस्थानकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची त्यांनी यावेळी माहिती दिली. तसेच या समस्येवर आता चर्चेची नाही तर प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

हिंदुस्थानात बायो-फ्युयल एकत्रित करुन पेट्रोल-डीझेल विकसित करण्यावर काम सुरू आहे. आगामी काही वर्षांमध्ये जल स्रोतांच्या संरक्षणाच्या कामासाठी 50 दशलक्ष डॉलर खर्च करणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. तसेच जल संरक्षणसाठी ‘जल जीवन मिशन’ची सुरुवात करण्यात आली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगवरही देशात काम सुरू आहे. पर्यावरण रक्षणासाठी देशात 11 कोटी कुटंबांना गॅसजोडणी देण्यात आली आहे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य दिनापासून सिंगल यूज प्लॅस्टीकचा वापर रोखण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. वातावरण बदलाची समस्या बिकट स्वरुप धारण करत आहे. त्यामुळे याबाबत गंभीर चर्चा करण्याऐवजी पर्यावरण रक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या