मोदी जिंकले अशा भ्रमात राहू नका, मोठ्या प्रमाणावर मतदान करा- मोदी

सामना ऑनलाईन । वाराणसी

आपल्या देशाच्या मतदारांनी मोदी जिंकले, मोदी जिंकले असेच वातावरण तयार केले आहे. मात्र असे कुणी म्हणत असेल तर भ्रमात राहू नका. अनेक भागात मतदान अजून बाकी आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर मतदान करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. शुक्रवारी वाराणसी येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह एनडीएच्या सर्व पक्षांचे प्रमुख याठिकाणी उपस्थित होते. नंतर त्यांनी वृत्तवाहिन्यांच्या माध्यामातून वाराणसीसह देशातील जनतेशी संवाद साधला.

‘मी काशीवासीयांचे अंत:करण पूर्वक आभार मानतो.
पाच वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा मला प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत. तब्बल 11 ते 12 तासांचा रोड शो झाला आहे. हे फक्त काशीवालेच करू शकतात. हिंदुस्थानच्या विकासासाठी काशीवासीय कट्टीबद्ध आहेत, असेही ते म्हणाले. माध्यम प्रतिनिधींचे आभार मानतानाच ते म्हणाले की, ‘आपण या उन्हात अथक काम करत आहात. मतदानासाठी लोकांना प्रोत्साहित करत आहात. त्याबद्दल आभार. आपले स्वास्थ्य जपा’.

दरम्यान, याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये बुथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कालभैरवाची पूजा आरती केली. त्यानंतर एनडीएच्या घटकपक्षाच्या सर्व प्रमुखांची भेट घेतली. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एनडीएची एक बैठक छोटेखानी बैठक झाली.