
पाकिस्तानाला उत्तर देण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराने अनेकदा प्रत्यक्ष सीमारेषा ओलांडून धडक कारवाई केलेली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईचा अतिप्रचार केला. मोदी गरजेपेक्षा जास्त बोलले. हाती काहीच लागले नाही, अशा स्पष्ट शब्दांत दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या आत्मचरित्रात खडसावले आहे. प्रणव मुखर्जी यांच्या ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ या आत्मचरित्राच्या चौथ्या खंडाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. यातील काही महत्त्वाची माहिती पुढे आली आहे.
1 मोदी अचानक पाकिस्तानला गेले आणि तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी असे करण्याची गरज नव्हती. हिंदुस्थान-पाकिस्तानचे संबंध तणावाचे होते. व्यक्तिगत संबंध गरजेपेक्षा जास्त वाढविणे चुकीचे आहे.
2 नेपाळचा राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह यांनी पंडित नेहरूंना नेपाळला हिंदुस्थानात सामाविष्ट करून घ्यावे, असा प्रस्ताव दिला होता. पण नेहरूंनी ही ऑफर फेटाळली होती. पण नेहरूंच्या जागी इंदिरा गांधी असत्या तर सिक्किमप्रमाणे नेपाळही हिंदुस्थानात असते.
3 सक्रीय राजकारणात असतो, तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसला नसता. मी अर्थमंत्री असतो तर ममता बॅनर्जी ‘यूपीए’त राहिल्या असत्या. तेलंगणा हे स्वतंत्र राज्य होऊ दिले नसते.




























































