
सामना प्रतिनिधी । मुंबई
जम्मू-कश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या भीषण हल्ल्यानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निवडणूक प्रचाराचा उद्घाटनांचा धमाका सुरू आहे. राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनांसाठी पंतप्रधान मोदी आज धुळे व यवतमाळच्या दौऱयावर येत आहेत.
नांदेड येथील एकलव्य आदर्श निवासी शाळेचे बटण दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करतील. तसेच नागपूर-अजनी-पुणेदरम्यान धावणाऱया या गाडीला व्हिडीओ लिंकद्वारे पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. केंद्रीय रस्ते निधीअंतर्गत बांधण्यात येणाऱया भूमिपूजनाचे पंतप्रधान बटण दाबून उद्घाटन करतील. त्यानंतर पंतप्रधान धुळय़ाला रवाना होतील. सुलवाडे-जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेची पायाभरणी, धुळे शहरातील पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन, धुळे-नरवाडा रेल्वेमार्ग व भुसावळ-वांद्रे खान्देश एक्स्प्रेस या रेल्वेला पंतप्रधान व्हिडीओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवतील.
























































