पंतप्रधानांच्या हस्ते रेल्वे स्थानक पुनर्विकास योजनेचा आरंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील कांजुरमार्ग, विक्रोळी, परळसह देशभरातील 1309 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याच्या अमृत भारत स्टेशन योजनेचा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन आरंभ केला. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 508 स्थानकांचा विकास होणार असून, महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा त्यात समावेश आहे. या योजनेत महाराष्ट्रातील कोल्हापूर, नगर, छत्रपती संभाजीनगर, बडनेरा जं., चंद्रपूर, गोंदिया, जालना, सेवाग्राम अशा काही स्थानकांचा यात समावेश आहे.