पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते. हॅकर्सनी रविवारी पहाटे त्यांचे अकाऊंट हॅक केलेले. मात्र काही वेळातच ट्विटरने त्याचे अकाऊंट रिस्टोर केले.

पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हॅकर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवरून बिटकॉइनबद्दल ट्विट केले होते. ‘हिंदुस्थानने बिटकॉईनचा वापर कायदेशीर केला आहे. सरकारने 500 बिटकॉईन खरेदी केले असून ते देशातील नागरिकांमध्ये वाटले जाणार आहेत’, असे ट्विट हॅकर्सने केले होते.